नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून मैत्री असलेल्या तरुणीला मित्राने शारीरिक संबंधाची मागणी करीत नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे तरुणीने उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी मित्राविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली. प्रवीण ठाकरे (१९, लोहारा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय तरुणी ही बारावीची विद्यार्थिनी आहे. ती दहावीत असताना तिची प्रवीणशी ओळख झाली. गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. प्रवीण हा एका कापडाच्या दुकानात नोकरी करतो. ती कॉलेजला जाताना प्रवीण रोज तिच्याशी गप्पा करीत कॉलेजच्या प्रवेशद्वारापर्यंत जात होता. प्रवीणचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते.

हेही वाचा : विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

मात्र, ती प्रेमसंबंधास नकार देऊन केवळ मैत्री ठेवण्यासाठी तयार होती. गेल्या १ जुलैला कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी तिला प्रवीणने लग्नाची मागणी घातली. तिने शिक्षण घेत असल्याचे सांगून त्याला लग्नास नकार दिला. त्यामुळे तो तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावत होता. ती त्याला सतत नकार देत होती. ‘तू शारीरिक संबंध प्रस्थापित करू दे, अन्यथा मी आत्महत्या करेल’ अशी त्याने धमकी दिली.
या धमकीमुळे मुलीच्या मानसिकतेवर परिणाम झाला. ती आजारी पडली. यादरम्यान तिने प्रवीणने धमकी दिल्यामुळे तणावात असल्याचे आईला सांगितले. आईने मुलीसह उमरेड पोलीस ठाणे गाठले. शारीरिक संबंधाची मागणी केल्याची प्रवीणविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

हेही वाचा : विश्लेषण : साजिद खानमुळे पुन्हा चर्चेत आलेली MeToo मोहीम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

दुसऱ्या एका घटनेत आरोपी विकास गंगाधर देखणे (२८, मुलगाव-सावनेर) हा रविवारी रात्रीच्या सुमारास प्रतापनगरात राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरात घुसला. त्यावेळी १४ वर्षीय मुलगी घरात एकटी होती. त्याने मुलीचा विनयभंग केला. विकास घराबाहेर जाताच तिने आईला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी तक्रारीवरून विकासविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.