गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी, जयरामपूर, सोमनपल्ली, मुधोली चक नं.-२, मुधाेली तुकुम या गावातील जमिनी ‘एमआयडीसी’साठी अधिग्रहित करण्यासंबंधी शासनाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे. याला गावकऱ्यांनी कडाडून विरोध केला असून स्थानिकांना राेजगार देण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र, प्रत्यक्षात राेजगार मिळत नाही. कंपनीमार्फत केवळ दहा ते बारा हजार रुपयांची अत्यंत कनिष्ट दर्जाची नाेकरी दिली जाते. ती नाेकरीसुद्धा कायमस्वरुपी नसते. त्यामुळे आम्ही आमची सुपीक शेतजमीन देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काेनसरी येथे १२९ एकर जागा २०१७ मध्ये अधिग्रहित करण्यात आली. या जमिनीवर आता लाेह प्रकल्प निर्मितीचे काम सुरू आहे. मात्र, या प्रकल्पापासून जवळच पुन्हा ९६३.०५२२ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यााबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. गावस्तरावर विशेष ग्रामसभा घेऊन जमीन अधिग्रहणाबाबत सहमती असल्याचा ठारव पारित करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. सदर पत्र दाखल हाेताच गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. पहिल्या दिवशी तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल विभागाचे इतर अधिकारी आले असता गावकऱ्यांनी त्यांना माघारी पाठविले. मात्र, पुन्हा जमीन अधिग्रहित करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत केली जात आहे. हे चुकीचे आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याला कडाडून विराेध दर्शविला आहे. शासन व प्रशासनाविराेधात तीव्र आंदाेलन केले जाईल, तसेच न्यायालयात जाणार मात्र जमीन देणार नसल्याचा निर्धार गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

हेही वाचा – नागपूर : नमो महारोजगार मेळावा आज, नोंदणीसाठी ५० स्टॉल्स

पत्रकार परिषदेला काेनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे, उपसरपंच रतन आक्केवार, सरपंच अश्विनी कुमरे, उपसरपंच छाया भाेयर, हरेश निखाडे, अतुल फरकाडे, राकेश दंडीकवार, अश्विनी कुमरे, छाया भाेयर, दीपाली साेयाम, दिलीप वर्दलवार, नीलकंठ निखाडे, नीलेश मडावी, रमेश काेडापे, निकेश गद्देवार, बिश्वास बाेमकंटीवार, सचिन बारसागडे, प्रशांत पावडे आदी जवळपास दाेनशे गावकरी उपस्थित हाेते.

हेही वाचा – गोंदिया : धक्कादायक..! मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा बदला अन् रचला अपघाताचा बनाव

सेमानाजवळच शेतकऱ्यांना अडविले

पाचही गावांतील नागरिक जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जाणार असल्याची कुणकुण प्रशासनाला माहीत झाली. गडचिराेलीकडे येत असताना मुधाेली चक, अड्याळ येथे शेतकऱ्यांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. सेमाना देवस्थानाजवळ पाेलिसांचा तगडा पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. तसेच शेतकऱ्यांना तेथेच अडविण्यात आले. फक्त दहा शेतकऱ्यांनाच जिल्हाधिकारी यांच्याकडे जाण्याची परवानगी देण्यात आली. याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजाराे लाेकांचा माेर्चा काढला जाताे. आम्ही तर केवळ २०० शेतकरी हाेताे, तरीही सेमानाजवळच अडविल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.