लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती : वाहन क्रमांक बदलवून धावत असलेल्या दोन खाजगी प्रवासी बसेसवर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने गुरूवारी दुपारी कारवाई केली. वझ्झर तपासणी नाका येथे दोन ४५ आसनी बस अडवण्यात आल्या.
दोन्ही खाजगी प्रवासी बसगाड्या या नंबर प्लेट बदलून धावत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांना मिळाली होती. त्यांनी वेळीच याची दखल घेऊन जिल्ह्यातील आरटीओच्या चेक पोस्ट, चेक पॉइंट व भरारी पथकामार्फत या बसेसचा शोध घेण्यास सांगितले.
आणखी वाचा-यवतमाळ : प्रेमासाठी वाट्टेल ते! प्रेयसीसाठी चार महिन्यांत दोन खून
या बसगाड्या नागपूर मार्गे इंदोर येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. परंतु आरटीओच्या वझ्झर येथील चेक पॉइंट वर दोन्ही बसगाड्यांना अडवून कागदपत्रांची मागणी केली असता वाहन चालकांनी दाखविलेले कागदपत्रे बनावट असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले. मोटार वाहन निरीक्षक दीपक मेहेरकर यांनी दोन्ही बसेसच्या वाहनचालकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलीही समाधानकारक माहिती न दिल्याने भरारी पथकाचे मोटार वाहन निरीक्षक राजन सरदेसाई, गणेश वरुटे, सागर ठोसरे सहायक मोटार वाहन निरीक्षक यांनी या बसगाड्या परतवाडा एसटी बस आगारात आणल्या.
आणखी वाचा-शेतमाल निर्यातबंदी कायमची बंद करा, शेतकरी संघटना आग्रही
दोन्ही बसेसच्या चेसिस क्रमांकावरून वाहनाचे निरीक्षण केले असता त्यातील एक बस एमपी १३ / पी ३१७७ ही नंबर प्लेट लावून धावत होती, ती मुळात एमएच ४० / टी ५४०० असल्याचे आढळून आले. तर दुसरे वाहन युपी ९५ / टी ४९५२ या वाहनाच्या चेसिस नंबरची खातरजमा होत नसल्याने सदर वाहन कोणाच्या नावे आहेत याबाबत शोध सुरू आहे. सदर वाहनांवर अंदाजे १८ लाखांच्या आसपास थकीत कर असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे. कर चुकवेगिरीच्या उद्देशाने नंबर प्लेट बदलून दोन्ही बसेस इतर राज्यात पाठविण्यात येत होत्या, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.