नाफेडमार्फत हरभरा खरेदी नोंदणीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतचे आदेश जारी झाले असून यासंदर्भात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला.
हेही वाचा >>>चंद्रपूर: ताडोबात ‘माया’साठी ‘रुद्रा’ व ‘बलराम’ या दोन वाघांमध्ये लढाई!, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
नोंदणीची मुदत १५ मार्चला संपुष्टात येणार असल्याने असंख्य शेतकरी नोंदणीपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. रविकांत तुपकर यांनी जिल्हा पातळीपासून राज्यस्तरावर मुदतवाढीची मागणी रेटून धरली. जिल्हाधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्यासह नाफेडचे बी.एम. पुनीतसिंग तसेच सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांच्याशी तुपकर यांनी चर्चा केली. जिल्हाधिकारी तुम्मोड यांनीही या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. शेतकऱ्यांच्या विविध अडचणी लक्षात आणून दिल्या. ६ मार्चपासून ते आजपर्यंत वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले.
शासनाने हरभरा खरेदीच्या नोंदणीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली असून, तसा शासन निर्णयदेखील जारी केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील हरभरा खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याच्या मागणीसाठी लढा सुरूच ठेवणार, असे तुपकर यांनी सांगितले.