अनिल कांबळे

नागपूर : महाराष्ट्रासह अन्य काही राज्यातील धनाढय़ आणि निपुत्रिक दाम्पत्यांना नवजात बाळ विकून बक्कळ पैसा कमावण्याचा प्रकार वाढला आहे. जवळपास सात राज्यांमधील काही अविवाहित तरुणी अनैतिक संबंध ठेवत बाळाला जन्म घालत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

Pandit Vishnu Rajoria on 4 Children
Video: ‘चार मुलांना जन्म द्या, एक लाख रुपये मिळवा’, ब्राह्मण जोडप्यांसाठी परशुराम मंडळाच्या अध्यक्षांची ऑफर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Child marriage exposed in Alandi
पिंपरी : बालविवाहाचा प्रकार आळंदीत उघड
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
children passport loksatta news
पालकांच्या वादात अल्पवयीन मुलांना पारपत्रापासून वंचित ठेवता येणार नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
Image of the Bombay High Court building or a related graphic
“सरासरी बुद्धिमत्ता असलेल्या स्रीला आई होण्याचा अधिकार नाही का?”, मुलीचा गर्भपात करण्याची मागणी करणार्‍याला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले
Russia paying students in cash to have babies
मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ देशात विद्यार्थ्यांना का दिले जात आहेत पैसे? नेमका हा प्रकार काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात बाळाची विक्री करण्याचे मुख्य केंद्र म्हणून उपराजधानीची ओळख निर्माण झाली होती. नागपुरात नवजात बाळांची विक्री करणाऱ्या काही टोळय़ा सक्रिय झाल्या. महाराष्ट्रासह अन्य राज्यात नवजात बाळाचा सौदा नागपुरातून होत होता. त्यामुळेच नागपूर पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेत मानवी तस्करी प्रतिबंधक पथक (एएचटीयू) स्थापन केले होते. राज्यात बाळ विक्री करणाच्या गुह्यात सर्वाधिक आरोपी नागपूर गुन्हे शाखेने अटक केले आहेत.

आयेशा ऊर्फ श्वेता खान, राजश्री सेन, रिटा प्रजापती, फरजाना अन्सारी, सीमा परवीन, सलाउल्ला खान, तोतया डॉ. विलास भोयर, पिंकी लेंडे, मोना, मकबुल खान या दलालांना गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या. या टोळय़ांचे संबंध थेट गुजरात, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि केरळपर्यंत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाळ विक्री करणाऱ्या टोळय़ा पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले होते. त्यातूनच अविवाहित तरुणी अवैध संबंध ठेवून गर्भधारणा करीत असल्याची नवी माहिती समोर आली आहे. पैशांसाठी अवैध संबंधातून जन्मलेल्या बाळांची विक्री दलालांच्या टोळय़ांमार्फत धनाढय़ दाम्पत्यांना करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही अविवाहित तरुणी स्वच्छेने बाळविक्रीसाठी गर्भवती होण्याचा निर्णय घेतात तर काही तरुणी नाईलाजाने बाळ विक्रीच्या व्यवसायात अडकल्याची माहिती पुढे आली आहे.

पहिला गुन्हा नागपुरात

नवजात बाळ विक्री केल्याचे राज्यातील पहिले प्रकरण नागपूर गुन्हे शाखेच्या ‘एएचटीयू’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर नवजात बाळ विक्री करणाऱ्या सहा टोळय़ांना बेडय़ा ठोकून जवळपास ११ बाळांची विक्री झाल्याचे समोर आले होते. बाळ खरेदी-विक्री केल्याचे ११ गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत तब्बल ४७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विक्री केलेल्या काही बाळांचा शोधही पोलिसांनी घेतला आहे.

नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळय़ांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी नागपूर पोलीस प्रयत्न करीत आहेत. बाळ विक्री करणाऱ्या काही टोळय़ांना पोलिसांनी अटक केली आहे. असे प्रकार होऊ नये म्हणून ‘एएचटीयू’ पथकाची स्थापना केली आहे.

– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर.

Story img Loader