नागपूर: राज्यात सोमवारी (४ सप्टेंबर) दुपारी १२ वाजता विजेच्या मागणीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाली. त्यामुळे भारनियमन झाले नाही. राज्यात सोमवारी दुपारी १२ वाजता महावितरणची एकूण विजेची मागणी २३ हजार १५० मेगावॉट होती. त्यानुसार वीज उपलब्ध झाल्याने राज्यात कुठेही भारनियमन झाले नाही. त्यामुळे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कुठेही भारनियमन झाले नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – घर दुर्घटनेत बाप-लेकीचा मृत्यू, ना मदत, ना सांत्वन,शासन ‘ त्यांच्या’ दारी गेलेच नाही

हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार…; वाचा, कुलपती कोणावर बरसले?

राज्यात १ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता महावितरणची विजेची मागणी २४ हजार ३०० मेगावॉट होती. तर मागणीच्या तुलनेत उपलब्ध विजेत ९०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने सकाळी ६ ते ७.३० वाजेदरम्यान जी १ ते जी ३ गटातील फिडरवर आपत्कालीन भारनियमन केले गेले. तर २ सप्टेंबरला विजेची शिखर मागणी सकाळी ५.४० वाजता २३ हजार ७०० मेगावॉटवर खाली आली. त्यानंतरही मागणीच्या तुलनेत विजेच्या उपलब्धतेत १ हजार २०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यात सकाळी ५.४० ते ७.१५ दरम्यान जी गटातील फिडरवर भारनियमन केले गेले. तर रविवारी आणि सोमवारी मात्र तुलनेत मागणीत किंचित घट झाली. महावितरणच्या मुंबईतील अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर याला दुजोरा दिला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief for electricity consumers in maharashtra no load shedding for two days mnb 82 ssb