चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलून जिल्ह्याला चौफेर विकासाच्या दिशेने नेणारे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आता लोकसभेची निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. अशाच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातील सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे एकाच दिवशी एकाचवेळी आपापल्या धार्मिक श्रद्धास्थानांवर सुधीर मुनगंटीवार यांच्या विजय संकल्पपूर्तीसाठी आराधना केली. कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्यासाठी अश्याप्रकारे धार्मिक स्थळांची आराधना करण्याचा हा प्रसंग दुर्मिळ मानला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> वर्ध्यात महाविकास आघाडीत त्रांगडे

आपल्या लाडक्या नेत्याला एखाद्या कार्यात यश मिळावे म्हणून त्यांचे चाहते विविध प्रकारच्या धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवाला साकडे घालतात.काही ठिकाणी पूजन, अभिषेक केला जातो तर काही ठिकाणी होम हवन केले जाते. काही समाज बांधवांकडून सामूहिक प्रार्थना आदींच्या माध्यमातून ईश्वराकडे संबंधित नेत्याला यश मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते.

हेही वाचा >>> प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यावर शरद पवारांचा सर्जिकल स्ट्राईक! बिनीच्या शिलेदाराने…

अगदी याच पद्धतीने सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर- वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रातील चाहत्यांनी सर्वधर्मीय प्रार्थना आणि महाआरतीच्या माध्यमातून ईश्वराकडे सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणुकीत यश प्रदान करावे अशी आर्त हाक दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वधर्मीय नागरिकांनी एखाद्या राजकीय लोकनेत्यासाठी अशा पद्धतीने आराधना करण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. मुनगंटीवार विरोधी पक्षाच्या बाकांवर असो किंवा सत्तेमध्ये त्यांनी संसदीय आयुधांचा वापर करत चंद्रपूर जिल्ह्याचा चौफेर विकास केला आहे. चंद्रपूरच्या विकासाचा हा रथ सध्या संपूर्ण वेगाने धावत आहे. अशात मुनगंटीवार दिल्ली दरबारी पोहोचल्यास त्याचा केवळ चंद्रपूर- वणी – आर्णी नव्हे तर संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्राला लाभ होऊ शकेल, असा विश्वास वाटत असल्यामुळे लोकसभा क्षेत्रातील नाही तर महाराष्ट्रातील त्यांचे अनेक चाहते मुनगंटीवार यांना यश मिळावे यासाठी मनोमन प्रार्थना करीत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar rsj 74 zws