नागपूर : समाजातील गोरगरीबांसाठी राज्य शासनाकडून शिव भोजन थाली योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून विविध केंद्रावरील फलकावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे छायाचित्र आहे. त्यामुळे हे फलक तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी करत पंडित दिनदयाल प्रतिष्ठानने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील गरजू जनतेला सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी २०२० मध्ये शिवभोजन थाळी योजना सुरू केली. राज्यातील विविध शहरात ही योजना राबविली जात आहे. ज्या ठिकाणी ही योजना राबविली जात आहे तिथे लावण्यात आलेल्या फलकावर अजुनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

हेही वाचा >>> “संघाचा पाया त्यागावर उभा कारण…”; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे विधान, म्हणाले…

हे फलक तात्काळ हटविण्यात यावे अशी मागणी दिनदयाल प्रतिष्ठानचे सुबोध आचार्य व श्याम चांदेकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने देवगिरी येथे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन दीड वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे छायाचित्र असलेले शिव भोजन थालीचे फलक लावण्यात यावे अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी हेमंत बरडे, राहुल खंगार, दिपांशु लिंगायत, सचिन सावरकर, अथर्व त्रिवेदी रुपेश हेडाऊ उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remove the banner with pictures of uddhav thackeray and nitin raut vmb 67 ysh