वर्धा : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलीस वेल्फेअर संस्थेचा पेट्रोल पंप उभारणे सुरू आहे. ही जागा विविध कार्यक्रमांसाठी उपयोगात येते. त्यामुळे विविध समुदाय एकत्र येत असतात. अशा ठिकाणी पंपाची जागा धोकादायक ठरते, असा युक्तिवाद करीत आंबेडकरी जनतेने यापूर्वी विविध आंदोलने केली. हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने बांधकाम सुरू करणे बेकायदेशीर ठरते, असा दावा पंपविरोधी कृती समितीचे निमंत्रक महेंद्र मुनेश्वर यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून यावर लक्ष वेधण्यात आले. यापूर्वी झालेल्या आक्रोश मोर्चाची पुनरावृत्ती होवू नये म्हणून पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. हा पंप अन्यत्र स्थलांतरित करावा, अन्यथा यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा – यवतमाळ : हिस्ट्रिशिटर गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची धडक कारवाई; मोक्का, एमपीडीए, हद्दपारचा बडगा

हेही वाचा – मनसे बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार; आढावा बैठकीत निर्णय

आज समन्वयक नीरज गुजर, मोहन राईकवार, अरविंद निकोसे, अरविंद खैरकार, आशीष सोनटक्के, सतीश इंगळे, अमित देशभ्रतार, कपिल चंदनखेडे, धर्मपाल शंभरकर, चिंतामण बुरबुरे, नितीन इंदुरकर, वसंत भगत, विशाल नगराळे, शारदाताई झांबरे, मेजर ढोबळे, अनिल इंगळे आदी नेत्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.