लोकसत्ता टीम

नागपूक : नागपूर रेलवे स्थानकावर रविवारी दुपारी मोठी दुर्घटना टळली. मुख्य मार्गिकेवरील मालगाडीला जोडलेल्या टँकरला आग लागल्याने खळबळ उडाली.

मालगाडीला जोडलेला डीजल टँकर मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील तडाली येथे जणार होता. त्याला नागपूर रेल्वे स्थानकावर आग लागली. याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करू लागले. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी फलाटावर तेलंगाना एक्सप्रेस उभी होतीा. ही आग मालगाडीला जोडलेल्या डिझेल टँकरपर्यंत पोहोचली असती तर अनर्थ घडला असता. पण रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ पावले उचलल्याने ही दुर्घटना टाळली.

रतलाम येथून चंद्रपूर जिल्ह्यातील ताड़ालीला जाणाऱ्या मालगाडीला तेल टैंकर जोडण्यात आला होता. मालगाड़ी दपारी ३..४५ वाजता नागपूरच्या रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ आणि २ च्या मुख्य मार्गिकेवर उभी होती. तेव्हा मालगाडीला अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. थोड्याच वेळात आगीची व्याप्ती वाढली. आगीने फलाटाच्या दोन्ही बाजूने लागलेल्या लाकडी शेडला कवेत घेतले.

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी फलाट क्रमांक एकवर तेलंगाना एक्स्प्रेस उभी होती. रेलवे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्वरित अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यावर आगीवर निंयंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकावरील मोठी दुर्घटना टळली. फलाटावरील घडामोडींचा अंदाज घेतल्यावर तेलंगाना एक्स्प्रेसला पुढे जाऊ देण्यात आले आणि आगग्रस्त मालगाड़ीला अजनी यार्डमध्ये पाठवण्यात आले.

दरम्यान मालगाडीला आग लागल्याचे लक्षात येताच रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला होता. तेथे उपस्थित प्रवाशानामध्ये भीातीचे वातावरण निर्माण झाले होते. कारण त्यांना फलाटावर उभ्या असलेल्या तेलंगाना एक्स्प्रेसमध्येच आग लागली असा समज झाला. त्यामुळे काही वेळापर्यंत स्थानकावर अफरातफरी माजली होती. परंतु काही काही काळाने ही आग मालगाडीतील असल्याचे स्पष्ट झाले.

दिल्लीच्या घटनेमुळे घबराट

शनिवारी रात्री नवीा दिल्ली स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे प्रवासी घाबरले होते. परंतु या घटनेनंतर देशभरातीाल रेल्वे प्रशासन सतर्क झाले होते. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकावर सुरक्षा अधिक कडेकोट करण्यात आली होती. फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली होती. मालगाड़ीच्या एका डब्ब्याला आग लागल्यावर सर्वच सतर्क झाले होते. ही आग कशी लागली याची चौकशी केली जात आहे.

Story img Loader