लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : वीजचोरीच्या प्रकरणांमुळे महावितरणला वीजहानीबरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागते. विजचोरीवर आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि १० टक्के रक्कमेचे बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे.

वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या १० टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे. वीजचोरी कळवणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येत असून नागरिकांनी वीजजोरीची माहिती लेखी, इमेल अथवा तोंडी कळवावी, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वीजचोरीची माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. वीजचोरीची माहिती केवळ लेखी, ईमेल अथवा तोंडी कळवावी.

आणखी वाचा-‘एनएचएम’च्या कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडले, आरोग्यमंत्र्यांना आश्वासनांचा विसर; सोमवारपासून मुंबईत…

महावितरणच्या संकेतस्थळावरून अथवा मोबाईल ऍपवरून वीजचोरीची माहिती देण्याची कुठलिही सुविधा नाही. नागरिकांनी त्यांना अवगत असलेल्या वीजचोरीची माहिती महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये अथवा फिरते पथक यांना कळवावी असेही आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Report power theft and get 10 percent reward mnb 82 mrj