नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी काँग्रेस नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राला एक ‘ट्रिलियन’ची अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी आर्थिक सल्लागार परिषद स्थापन केली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. समितीत, रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अदानी, अदानी पोर्टचे सीईओ करण अदानी यांच्यासह या १९ सदस्यांचा समावेश आहे. मात्र, परिषदेत विदर्भाला प्रतिनिधित्व नाही. विदर्भात नागपूर आणि अमरावती हे दोन मोठे महसूल विभाग येतात.

हेही वाचा >>> ‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वरून ओळख वाढविताना सावधान!

परिषदेत विदर्भाचा एकही विभागीय आयुक्त दर्जाचा अधिकारी किंवा स्थानिक उद्योजकाचा समावेश नाही. याबाबत विदर्भवाद्यांमध्ये रोष आहे. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के जनता ही विदर्भात राहते, त्या प्रमाणात विदर्भाला प्रतिनिधित्व मिळणे अपेक्षित आहे. मात्र, याचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे सल्लागार परिषदेवर विदर्भाला प्रतिनिधित्व द्यावे, अशी विनंती राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Represent vidarbha on economic advisory council dr nitin raut letter to chief minister rbt 74 ysh