नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १५ ते १७ मार्च दरम्यान नागपुरातील संघाच्या स्मृती मंदिर परिसरात होणार आहे. राम मंदिर निर्माणानंतर त्यासंदर्भातील पुढील योजना, संघाचे शताब्दी वर्ष, शाखांचा विस्तार अशा महत्त्वाच्या विविध प्रस्तावांवर यात चर्चा होणार आहे. सरसंघचालकांनंतर दुसरे महत्त्वाचे पद असलेल्या सरकार्यवाह पदाची निवडणूक हे या बैठकीचे वैशिष्ट्य राहणार आहे.

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या संदर्भात माहिती दिली. श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा ही फार मोठी ऐतिहासिक घटना असून याचे सकारात्मक दुरगामी परिणाम होणार आहेत. त्यादिशेने भविष्यातील योजना ठरवण्यावर प्रतिनिधी बैठकीमध्ये प्रस्ताव ठेवला जाणार असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.  २०२५च्या विजयादशमीला संघाला शंभर वर्षे पूर्ण होणार असल्याने हे महत्त्वाचे वर्ष  आहे. वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक अत्यंत महत्त्वाची असून स्मृती मंदिर परिसरात १५ ते १७ मार्च तीन दिवस चालणार आहे. प्रत्येक तीन वर्षातून ही सभा नागपुरात होते. बैठकीला संघाच्या ३२ संघटनांचे प्रमुख, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपचे अध्यक्ष, संघटन मंत्री असे देशभरातून १५२९ कार्यकर्त्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे आंबेकर यांनी सांगितले. यात प्रांत आणि क्षेत्रीय स्तरावर संघाच्या विविध संघटनांचे काम करणाऱ्यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Parliament Budget Session
Parliament Budget Session : “किती जणांचा मृत्यू झाला? नेमकं सत्य काय?”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून मल्लिकार्जुन खरगे आक्रमक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
Union Budget 2025 nirmala sitharaman sensex
Union Budget 2025 Highlights : “देशावर ६० वर्षे राज्य करूनही, काँग्रेस ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर कर सवलत…”, काँग्रेसच्या टीकेवर भाजपाचा पलटवार
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Union Budget 2025 Finance Minister Nirmala Sitharaman
Union Budget 2025 : नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंगबाबत मोठी घोषणा होणार? अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांचं लक्ष
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
rahul gandhi arvind kejriwal (1)
‘या’ धर्मातील नागरिकांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, मोफत तीर्थयात्रा घडवणार; केजरीवालांवर भेदभावाचे आरोप

हेही वाचा >>>“तर अंत्यविधीच्या साहित्यावरही भाजपची जाहिरात..” काय म्हणाले रोहित पवार ?

 प्रतिनिधीसभेच्या पहिल्या दिवशी १५ मार्चला सकाळी कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये प्रांत संघचालक, कार्यवाह, प्रांत प्रचारकांची उपस्थितीत प्रस्तावावर चर्चा केली जाईल. त्यानंतर क्षेत्र संघचालकांची निवड होऊन  संघाचे प्रतिनिधी सरकार्यवाह यांची निवड करतील. शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी सकाळी ही निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांची फेरनिवड होणार की, नवीन चेहरा येणार याबाबत संघाकडून कुठलेही संकेत  नाहीत. सहसरकार्यवाहपदी असलेले मनमोहन वैद्य यांना बढती मिळून ते सरकार्यवाह होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Story img Loader