नागपूर : देशातील आणि विशेषत: विदर्भातील संत्री उत्पादक शेतकऱ्यांसमोर फळगळतीची मोठी समस्या असते. मात्र, आता फळगळती झालेल्या संत्र्यापासून विविध उत्पादने तयार करण्यात येणार आहे. वर्धेतील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्थेच्यावतीने (एमगिरी) फळगळती झालेल्या फळापांसून विविध उत्पादने तयार करण्यावर संशोधन सुरू आहे. लवकरच उत्पादन निर्मितीसाठी लघुउद्योग केंद्र उभारले जाण्याचीही शक्यता आहे.
इंडियन सोसायटी ऑफ सिट्रिकल्चरच्यावतीने नागपूरमध्ये दोन दिवसीय ‘एशियन सिट्रस कॉँग्रेस-२०२३’ आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देश विदेशातील संत्री उत्पादक संस्था, तज्ज्ञ यांनी सहभाग घेतला. परिषदेच्या अंतर्गत वर्धेतील एमगिरी संस्थेद्वारे फळगळती झालेल्या संत्र्यांबाबत विशेष सादरीकरण करण्यात आले. फळगळती ही शेतकऱ्यांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. गळलेल्या फळांना बाजारात योग्य भाव न मिळाल्याने अनेक संत्री उत्पादक हवालदिल होतात. या कारणामुळे शेतकरी संत्री उत्पादनापासून दूर जात असून याचा थेट परिणाम एकूण उत्पन्नावर होतो. शेतकऱ्यांच्या या समस्येवर तोडगा काढण्याचे काम एमगिरीने केले आहे. एमगिरीमधील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रशांत तायडे यांनी या संशोधनाबाबत माहिती दिली. एमगिरीचे संचालक डॉ. आशीष मुरकुटे यांच्या मार्गदर्शनात एमगिरीमधील रासायनिक ग्रामोद्योग विभागात हे संशोधन झाले असून संत्री उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर बाब ठरणार आहे, असे डॉ. तायडे म्हणाले.
हेही वाचा >>> अवघ्या दोन तासात सोन्याच्या दरात ३०० रुपयांची घसरण, ‘हे’ आहेत आजचे दर
‘हे’ उत्पादन होणार
फळगळती झालेल्या संत्र्यापासून चार प्रकारचे उत्पादन घेतले जाईल. खाण्यायोग्य फायबर, तेल यांची निर्मिती संत्र्यांपासून केली जाईल. याशिवाय खाद्य उद्योगात आवश्यक असलेले ‘पेक्टिन’ची निर्मिती देखील केली जाईल. हृदयरोग, रक्तवाहिन्यांसंबंधित आजारावर वापरली जाणारी ‘हेस्पिरिडीन’ औषधाची निर्मिती सुद्धा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना फळगळती झालेल्या संत्र्यांचाही पूर्ण भाव या माध्यमातून मिळणार आहे. एमगिरीमध्ये या उत्पादकांसाठी लघुउद्योग यंत्रणेची निर्मिती केली जाण्याची शक्यता आहे. एमगिरीमध्ये लवकरच याबाबत कार्यशाळा आयोजित केली जाईल, अशी माहिती डॉ. तायडे यांनी दिली.