नागपूर: भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) मागील दीड वर्षामध्ये डिजिटल व्यवहार जनजागृतीवर ५९.२९ कोटी रुपये खर्च केले. त्यानंतरही देशभरातील बँकांमध्ये या काळात २ हजार ८८० कोटी १७ लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली. माहिती अधिकार कायद्यातून हा तपशील समोर आला आहे.

देशभरातील बँकांमध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान २ लाख ९३ हजार ४८७ सायबर फसवणुकीचे प्रकार घडले. यामध्ये २ हजार ६५ कोटी ६८ लाख रुपये, १ एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ मध्ये १ लाख ४० हजार ९३० प्रकरणांमध्ये ८१४.४९ कोटी रुपये लुबाडले गेले.

Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती

१ एप्रिल २०२३ ते १५ सप्टेंबर २०२४ दरम्यान आरबीआयकडून डिजिटल व्यवहार जनजागृतीवर ५९ कोटी २९ लाख ७९ हजार ५४२ रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यात सेंट्रल बँक डिजिटल चलन जनजागृतीवर ५ कोटी ४७ लाख ६८ हजार ५९८ रुपये, डिजिटल व्यवहार जनजागृतीवर १९ कोटी ११ लाख ७३ हजार ११९ रुपये, डिजिटल व्यवहार जनजागृती सप्ताहावर १७ कोटी २९ लाख २७ हजार ३२० रुपये, आधार संलग्न व्यवहार जनजागृतीवर १७ कोटी ४१ लाख १० हजार ५०५ रुपये खर्च करण्यात आल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी याबाबतची माहिती मागितली होती.

हेही वाचा : फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”

देशात डिजिटल व्यवहार वाढले, परंतु डिजिटल फसवणूकही वाढत आहे. आरबीआयने दीड वर्षात डिजिटल व्यवहार जनजागृतीवर सुमारे ६० कोटींचा खर्च केला. त्यानंतरही देशभरातील बँकांमध्ये २ हजार ८८०.१७ कोटींच्या फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली. ही फसवणूक टाळण्यासाठी प्रभावी उपाय गरजेचे आहेत.

अभय कोलारकर, माहिती अधिकार कार्यकर्ते, नागपूर.

Story img Loader