चंद्रपूर: शिवारात गेलेल्या इसमाला वाघाने हल्ला करून ८०० मीटरपर्यंत फरपटत नेल्याची घटना बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील चकपिरंजी बीट क्रमांक ३९७ मधील रुद्रापूर येथे घडली. बाबुराव बुधाजी कांबळे (६०) असे मृताचे नाव असून तो रुद्रापूर येथील रहिवासी होता. एकाच आठवड्यात वाघाने दोघांचा बळी घेतल्याने सावली तालुक्यातील नागरिक भयभीत झालेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ई- रिक्षा, ई- मालवाहक वाहनांना नियम नाहीत काय?; विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचा सवाल

हेही वाचा >>> न्यायालयाची नागपूर विद्यापीठ प्रशासनाला चपराक; १७ डिसेंबरच्या पदवीधर निवडणुकीला स्थगिती

मृत बाबुराव कांबळे हा रूद्रापूर परिसरात गेला होता. पाठीमागील शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला करून त्याला ठार केले. घटनास्थळापासून जवळपास ८०० मीटरपर्यंत फरफटत नेले. ही घटना गावाला लागूनच असल्याने गावकऱ्यांनी आरडाओरड करीत वाघाच्या मागे धाव घेतली. त्यामुळे वाघाने मृतदेह सोडून पळ काढला. माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून उत्तरीय तपासणीकरिता मृतदेह पाठवला. वनविभागाकडून मृताच्या कुटुंबास २५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.