चंद्रपूर : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या घोषणेनंतर पक्षात खळबळ उडाली आहे. शरद पवारांनी पद सोडल्यापासून चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी पक्षातही राजीनामा देणे सुरू झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्यासह कार्यकारिणीने पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोमाणी यांनी राजीनामा दिला आहे. मंगळवारी मुंबईत आपल्या पुस्तकाचे प्रकाशन करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे पवारांच्या समर्थनार्थ पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली. त्याच अनुषंगाने चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीनेही राजीनाम्याची घोषणा करत हायकमांडकडे राजीनामा पाठवला आहे.

हेही वाचा – तारांकित हॉटेलातील वारांगणांच्या खोलीत ‘तो’ शिरला अन्… रशिया, उझबेकिस्तानातून देहव्यापारासाठी गाठले नागपूर

राजीनामा देणाऱ्यांमध्ये चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष बेबी उईके, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यादरम्यान वैद्य यांनी आपले निवेदन जारी केले की, “आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षात काम करू. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आहे की, शरद पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार नसतील तर आम्हीही आमच्या पदावर राहणार नाही. आम्ही सर्व पवार यांच्या सोबत आहोत. नुकतीच शरद पवार यांनी भाकरी बदलण्याची गरज व्यक्त केली होती. पवार साहेबांना जिल्ह्यात काही बदल करायचे असतील तर तेदेखील करू शकतात, असेही वैद्य म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resignation started in chandrapur district ncp rsj 74 ssb