बुलढाणा : राज्यातील नाट्यमय व धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस समितीच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज संध्याकाळी उशीरा येथे पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार राजेंद्र शिंगणेंच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. यामुळे ही बैठक चांगलीच गाजली. यावरून नजीकच्या काळात काँग्रेस विरुद्ध राजेंद्र शिंगणे समर्थक विरुद्ध काँग्रेस असे वाकयुद्ध पेटण्याची चिन्हे आहे.

हेही वाचा >>> नागपुरात वैद्यकीय उपकरण निर्मिती केंद्र तयार करा… नितीन गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभी फुट व बंडाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीची फारशी वाच्यता करण्यात आली नव्हती. प्रसिद्धी माध्यमांनाही दूर ठेवण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख नेते, प्रदेश कार्यकारिणीतील  पदाधिकारी, जिल्हा समितीचे पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख हजर होते. या बैठकीत बूथ समित्या व ग्रामशाखा मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले. येत्या १५ आगस्ट पर्यंत काँग्रेसचे जिल्ह्यात मजबूत संघटन उभारण्यासाठी अभियान राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

हेही वाचा >>> चंद्रपूर: खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पाचव्या वर्गातील तीन बालकांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू; तोहोगावात शोककळा

हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडला ठराव माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या निषेधाचा ठराव मांडला. आ. शिंगणे यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेताना त्याचे खापर विनाकारण काँग्रेसवर फोडल्याचे सपकाळ म्हणाले. त्यांनी कुठे जावे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, मात्र त्याचे खापर काँग्रेसच्या माथी फोडू नये, असे सपकाळ यांनी सांगितले. त्यांचे वक्तव्य निषेधार्थ आहे. त्यांच्या लोकसभेच्या दोन निवडणुकीत काँग्रेसने ताकदीने त्यांचा प्रचार केल्याचे सपकाळ यांनी ठणकावून संगीतले. हा ठराव पारित करण्यात आल्याचे सूत्रांनी अनामिक राहण्याच्या अटीवर सांगितले.