लोकसत्ता टीम
वर्धा: मोदी सरकारच्या नऊ वर्षातील कामगिरीचा आढावा जनतेपुढे सादर करण्याच्या अभियानात खासदार रामदास तडस यांच्यावर चार लोकसभा मतदारसंघाचे संयोजक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली आहे. या नऊ वर्षातील कामगिरी जनतेला वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमांतून पोहचविण्याचा कार्यक्रम भाजपने आखला आहे. विदर्भातील भंडारा-गोंदिया, चंद्रपूर-गडचिरोली, नागपूर व वर्धा या चार लोकसभा क्षेत्राचे जनसंपर्क अभियान संयोजक म्हणून खा.रामदास तडस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा… ‘लालपरी’चा आज वाढदिवस! पण सर्व कार्यक्रम रद्द, कारण काय? जाणून घ्या…
केंद्र सरकारचं या नऊ वर्षातील कार्य व त्यामुळे जनतेचे उंचावलेले जीवनमान लोकांपुढे मांडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ती यशस्वी करण्याचा प्रयत्न करेल असे नमूद करीत खा.तडस यांनी या नियुक्तीबद्दल उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे.