ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व तेथील वाघांची भुरळ जगातिल पर्यटकांना आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सेवानिवृत्त क्रिकेटर मॅथ्यू हेडन याला देखील ताडोबातील वाघाने भुरळ घातली. सध्या हेडन ताडोबा मुक्कामी असून ताडोबातील जुनाबाई या वाघिणीसोबत तिच्या दोन शावकांनी मुक्त दर्शन दिले. भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा सामना नुकताच संपला. या सामन्याला मॅथ्यू हेडन व मार्क वाग्यू हे दोघे हजर होते. यातील हेडन याने क्रिकेट मधून निवृत्ती पत्करली आहे. त्यामुळे तो केवळ सामना बघण्यासाठी नागपुरात आला होता. तर वाग्य हा ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर : येथे जागतिक प्रेमदिन साजरा करण्याची पद्धतच अनोखी, गोंडराजे बिरशाह व रानी हिराई…
पाच दिवसीय क्रिकेट मॅच तीन दिवसात संपली. यात भारत विजयी झाला. अशात उर्वरीत दोन दिवस ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा आनंद लुटण्यसाठी मॅथ्यू हेडन व मार्क हे दोघेही दाखल झाले. बांबू रिसोर्ट मध्ये या दोघांनी मुक्काम केला. मदनापूर प्रवेशव्दार येथून ताडोबात प्रवेश केला. या दोघांनाही जुनाबाई व तिच्या दोन शावकांनी मुक्त दर्शन दिले. सलग दोन दिवस या दोन्ही क्रिकेटरनी ताडोबात जंगल सफारीचा आनंद लुटला. ताडोबातील वाघ सर्वदूर प्रसिध्द आहे. केवळ व्याघ्र सफारी व वाघांना जवळून बघण्यासाठी म्हणूनच हे दोघे येथे आले होते. दोघांनाही व्याघ्रदर्शन झाल्याने दोघेही आनंदी मनाने परत गेले.