वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. जाखड यांचे शिकारी टोळीशी संबंध असल्याचे आणि या टोळीने सावली परिसरात २ पूर्ण वाढ झालेल्या वाघांची शिकार केल्याचे समोर आले आहे. तेलंगणा राज्यातील करीमनगर येथून अटक करण्यात आलेल्या व सध्या गडचिरोलीतील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या १३ आरोपींची वनविभागाच्या विशेष कार्यदलाद्वारे (स्पेशल टास्कफोर्स) चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे देशभरातील संबंधित व्यक्तींवर वनविभागाद्वारे पाळत ठेवण्यात येत होती. यात याद्वारे शिकारी टोळींचे एका विशेष व्यक्तीशी आर्थिक संबंध असल्याची बाब उघडकीस आली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड यांना ३१ जुलै रोजी अटक केली. महाराष्ट्र वनविभागाने तांत्रिक तपास करून आरोपीचे शिकाऱ्यांशी असलेले आर्थिक संबंध उघड केले आहे.

हेही वाचा >>> फॉक्सकॉनचा कर्नाटककडे ओढा; पाच हजार कोटी रुपये गुंतविणार; १३ हजार रोजगार निर्मिती

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mangalsutra thief arrested thane, Mangalsutra thief,
ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी

दरम्यान, या जाखड यांच्याशी आमची ओळख दिल्ली सरकारच्या दोन वन्यजीव निरीक्षकांनी करून दिली होती आणि त्यांनी आम्हाला त्याला नोकरी देण्याची विनंती केली. त्यांच्या शिफारशीमुळेच भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेने (डब्ल्यूपीएसआय-वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया) त्याला सुरुवातीला तीन महिने क्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्त केले. मात्र, आर्थिक अडचणीमुळे २०१० मध्ये त्याची सेवा बंद करण्यात आली. मात्र, त्यानंतरही तो २०१० पासून अधूनमधून भारतीय वन्यजीव संरक्षण संस्थेला दूरध्वनी करून शिकारी आणि अवैध वन्यजीव व्यापाऱ्यांची माहिती देत असे. कोणतीही कारवाई करण्यायोग्य माहिती प्राप्त होताच अंमलबजावणी एजन्सींना ताबडतोब पाठवून दिली जात होती. याव्यतिरिक्त आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. तेव्हापासून त्याने कोणत्या बेकायदेशीर कृती केल्या असतील याची आम्हाला माहिती नाही, अशी माहिती डब्ल्यूपीएसआय, मध्यभारतचे संचालक नितीन देसाई यांनी दिली.