वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. जाखड यांचे शिकारी टोळीशी संबंध असल्याचे आणि या टोळीने सावली परिसरात २ पूर्ण वाढ झालेल्या वाघांची शिकार केल्याचे समोर आले आहे. तेलंगणा राज्यातील करीमनगर येथून अटक करण्यात आलेल्या व सध्या गडचिरोलीतील मध्यवर्ती कारागृहात असलेल्या १३ आरोपींची वनविभागाच्या विशेष कार्यदलाद्वारे (स्पेशल टास्कफोर्स) चौकशी केली जात आहे. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे देशभरातील संबंधित व्यक्तींवर वनविभागाद्वारे पाळत ठेवण्यात येत होती. यात याद्वारे शिकारी टोळींचे एका विशेष व्यक्तीशी आर्थिक संबंध असल्याची बाब उघडकीस आली. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीत सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड यांना ३१ जुलै रोजी अटक केली. महाराष्ट्र वनविभागाने तांत्रिक तपास करून आरोपीचे शिकाऱ्यांशी असलेले आर्थिक संबंध उघड केले आहे.
चंद्रपूर : वाघांच्या शिकारप्रकरणी दिल्लीतील सेवानिवृत्त वनाधिकाऱ्याला अटक
महाराष्ट्र वनविभागाने तांत्रिक तपास करून आरोपीचे शिकाऱ्यांशी असलेले आर्थिक संबंध उघड केले आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-08-2023 at 21:43 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired delhi forest officer arrested in tiger hunting case rsj 74 zws