सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असलेल्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरवंड(ता. बुलढाणा) येथे आज उघडकीस आली. सुखलाल विठोबा लवंगे( वय ६८, राहणार वरवंड ता.बुलढाणा) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव नाव आहे. त्यांनी वरवंड येथील आपल्या राहत्या घरी २ जानेवारीला रात्री गळफास घेत जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पत्नी आपल्या भावाला भेटण्यासाठी पिंपरी ( तालुका जामनेर, जिल्हा जळगाव) येथे गेल्याने ते घरी एकटेच होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अकोला : तलावांवर पाहुणे पक्षी डेरेदाखल! नववर्षात कृष्ण करकोचासह विविध पक्ष्यांच्या दर्शनाची पर्वणी

आज मंगळवारी आत्महत्येची बाब लक्षात येताच त्यांचा पुतण्या गजानन लवंगे यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यू अंतर्गत घटनेची नोंद केली आहे. दरम्यान निवृत्तीच्या दहा वर्षानंतर त्यांनी आत्मघाताचा टोकाचा निर्णय का घेतला असावा याबद्धल विविध तर्क वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired officer committed suicide by hanging himself in buldhana scm 61 zws