बुलढाणा : भरधाव मालमोटारीने दुचाकीला दिलेल्या धडकेत येथील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झल्याची घटना बुलढाणा-चिखली राज्य महामार्गावरील येळगाव नजीकच्या वळणावर आज, रविवारी घडली.

हेही वाचा >>> नागपूर : नोकरीविषयक निवड मंडळांकडून मुस्लिमांकडे दुर्लक्ष – शरद पवार

हेही वाचा >>> चंद्रपूर : नऊ बकऱ्या फस्त करणारा महाकाय अजगर असा पकडला..

विनोद काशिनाथ पाटील (५५, रा. सुंदरखेड, ता. बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत उपनिरीक्षकपदी कार्यरत पाटील यांनी सुमारे ३ महिन्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते नजीकच्या सुंदरखेड येथे स्थायिक झाले होते. आज, रविवारी दुपारी ते पूजेचे निर्माल्य टाकण्यासाठी दुचाकीने येळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या (एमपी ०९- ८०४४ क्रमांकाच्या) मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर वाहन जागीच उभे करून चालक पसार झाला.

Story img Loader