लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : वर्धा-नागपूर मार्गावर पवनारसमोर झालेल्या अपघातात अवधूत वैरागडे (६०) आणि त्यांची पत्नी चित्रा (५५) यांचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेचे निवृत्त शिक्षक असलेले वैरागडे हे पत्नी चित्रासह भाचीच्या लग्न सोहळ्यासाठी गेले होते.

कार्यक्रम आटोपल्यानंतर ते केळझर येथे परत येण्यासाठी आपल्या दुचाकीने निघाले. त्याचवेळी मागून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीस मामा-भांजा समाधीसमोर जोरदार धडक दिली. त्यात वैरागडे हे जागीच ठार झाले तर पत्नी चित्रा यांचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ठाणेदार संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत कारवाई सुरू केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired teacher dies along with wife in accident while returning from wedding pmd 64 mrj