वर्धा: सेलू येथील काही भाविकांचा जत्था चार धाम यात्रेवर गेला आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री व यमुनेत्री यात्रेवर असतांनाच दुःखद घटना घडली. दिपचांद विद्यालयातून निवृत्त झालेले कृष्णाजी माहुरे हे शिक्षक सुध्दा परिवारासह त्यात होते.
शुक्रवारी केदारनाथ दर्शन आटोपून गौरीकुंड कडे त्यांचा प्रवास सुरू झाला. रात्री सात वाजता ते घोड्यावर बसून प्रवास करीत असतानाच त्यांची तब्येत बिघडली. हृदय विकाराचा झटका आल्याने ते घोड्यावरच निपचित पडले. सोबत असलेल्यांनी त्यांना तेथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेव्हा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
हेही वाचा… गोंदिया जिल्ह्यात हेल्मेटसक्ती लागू होणार; वाहतूक विभागाला उशिरा सुचलेलं शहाणपण
शरीरातील प्राणवायूची पातळी घटल्याने हे संकट ओढविल्याचे सांगण्यात आले. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. भाजपचे ते सक्रिय कार्यकर्ते होते.