नागपूर : दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात प्रवेश केला आहे. शनिवारी दुपारपासूनच अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने सात -आठ तारखेपासून परतीच्या पावसाचा इशारा दिला होता. मात्र, तो खोटा ठरवत खासगी हवामान केंद्रांनी दिलेला अंदाज खरा ठरला.
हेही वाचा : अकोला : आमदार मिटकरी व जिल्हाध्यक्ष मोहोड यांच्यातील मतभेद टोकाला
नागपुरात रविवारी सकाळपासून संथ पावसाला सुरुवात झाली, पण नंतर पावसाचा वेग वाढला. यवतमाळ जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अमरावती जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वर्धा, गोंदिया, अकोला भंडारा, जिल्ह्यात संततधार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात देखील रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने विदर्भात पूरस्थिती उद्भवली होती. त्यामुळे परतीचा पाऊसही अशीच परिस्थिती निर्माण करेल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.