डॉक्टर, पोलिसांची सहृदयता

अकोला : बार्शीटाकळी रेल्वेस्थानकावर एक जण जखमी अवस्थेत आढळला होता. बेवारस म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. महिनाभराचा उपचार, सुश्रूषा, समुपदेशनानंतर रुग्ण बरा झाला. ‘अपस्मार’ग्रस्त असल्याने रुग्णाला काहीही आठवत नव्हते. या प्रकरणात पोलीस तपासातील एक चिठ्ठी निर्णायक ठरली. तब्बल महिनाभराच्या प्रयत्नानंतर उत्तर प्रदेशमधील ‘अपस्मार’ग्रस्त रुग्णाची आईसोबत भेट घडवून आणली गेली. या निमित्ताने अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर, कर्मचारी व रेल्वे पोलिसांच्या सहृदयतेचा प्रत्यय आला.

हेही वाचा >>> राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस नेत्यांची ‘सुरतेवर स्वारी’!, पण सीमेवर रोखले; यशोमती ठाकूर म्हणतात, “त्यावेळी अशीच…”

Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rishi kapoor was scared of raj kapoor
वडील घरी आले की घाबरून लपायचो, ऋषी कपूर कारण सांगत म्हणालेले, “ते खोलीत…”
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Vikrant Massey Family Live in Godown
“घरातून बाहेर काढलं, वर्षभर गोदामात राहिलो…”; बॉलीवूड अभिनेत्याने सांगितल्या कठीण काळातील आठवणी
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला

बार्शीटाकळी येथील रेल्वेस्थानकावर २६ फेब्रुवारी रोजी एक ४० वर्षीय रुग्ण जखमी अवस्थेत रेल्वे रुळावर आढळून आला. रेल्वे पोलिसांनी त्या रुग्णाला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. रुग्णाची अवस्था बिकट होती. डोक्याला मार लागल्यामुळे त्याला आपले नाव व पत्ता काहीच सांगता येत नव्हते. गंभीर अवस्था असल्याने वेदना असह्य होत होत्या. त्यामुळे प्रचंड चिडचिड व आरडाओरड करत होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शल्य विभाग, अस्थिव्यंगोपचार व मनोविकृती अशा सर्व विभागांनी या रुग्णावर आवश्यक तपासण्या, उपचार, शस्त्रक्रिया केल्या. तब्बल एक महिन्याने हा रुग्ण पूर्ण बरा झाला. या रुग्णाला ‘अपस्मार’ हा आजार. जीव वाचला पण रुग्णाला स्वतःची ओळख नव्हती. त्याला पुढील पुर्नवसनासाठी समाजसेवा अधीक्षक अमोल शेंडे यांच्याकडे पाठविण्यात आले. समुपदेशनादरम्यान हा रुग्ण वारंवार घरी जाण्याचा आग्रह करायचा. मात्र त्याला घरचा पत्ता आठवत नव्हता.

हेही वाचा >>> शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा अन् वादाला तोंड; कोण बाजी मारणार, आ. पंकज भोयर की समीर कुणावार?

बार्शीटाकळी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी रुग्णाची विचारपूस केली. त्याच्याकडून जमा करण्यात आलेल्या एका चिठ्ठीची निर्णायक भूमिका ठरली. हा रुग्ण उत्तरप्रदेशातील इलाहाबाद जिल्ह्यातील असल्याचा धागा गवसला. त्यांनी तेथील पोलीस कार्यालयाशी संपर्क साधला. अखेर हा तरुण मोहम्मद आरीफ मोहम्मद अख्तर (रा. गुलारीया पो.फुलपूर, ता. हांडीया) अशी ओळख असल्याचे उत्तरप्रदेश पोलिसांनी खात्रीपूर्वक सांगितले. उत्तर प्रदेश पोलिसांनी या रुग्णाच्या आईसोबत संपर्क साधून रुग्णाशी बोलणे करुन दिले. गेल्या महिन्याभरापासून हा बेपत्ता असल्याने त्याची आई, भाऊ आणि नातेवाईक त्याचा शोध घेत होते. महिन्याभरानंतर त्याचा शोध लागल्याने आई, भाऊ, नातेवाईक आनंदीत झाले. अथक प्रयत्नानंतर अखेर रुग्णाची त्याच्या परिवाराशी भेट घडवून आणली. या रुग्णाची देखभाल अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक भुपेन्द्र पाटील, अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ.गजेंद्र रघुवंशी, डॉ.अमित जाधव, अधिसेविका ग्रेसी मारीयान, समाजसेवा अधीक्षक अमोल शेंडे, परिचारिका यांनी विशेष परिश्रम घेतले.

खिशातील चिठ्ठीने दाखवला मार्ग या रुग्णाच्या नातेवाईकांना त्याच्या ‘अपस्मार’ आजाराची माहिती होती. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनी त्याच्या खिशात संपूर्ण पत्ता लिहिलेली चिठ्ठी ठेवली होती. पोलिसांनी रुग्णाला दाखल केले, त्यावेळी ती चिठ्ठी जपून ठेवली. त्यावरुनच सर्व उलगडा झाला.