नागपूर :समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूली कायद्यात सुधारणा आवश्यक आहे त्यादृष्टीने काम करणार, असे नवनिर्वाचित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांच्या परभणी दौ-यावर टीका केली बावनकुळे नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. मला महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे, संपूर्ण महसुली कायद्यांना शेतकरी शेतमजुरांना समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूल खात्यात कायद्यात सुधारणा आवश्यक आहे त्यादृष्टीने काम करणार आहे. आजछोट्या छोट्या कारणामुळे विकास प्रकल्प थांबले आहे. त्याला पुढे नेण्याचे काम करू, ८६ हजार हेक्टर झुडपी जंगल नसताना त्याच्या नोंदी केल्या आहेत. त्याप्रमाणे उच्च न्यायालयात ते प्रकरण सुरू आहे. लवकर झुडपी जंगल मुक्त होईल असेही बावनकुळे म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भातील झुडपी जंगल जमिनीमुळे विकास प्रकल्प थांबले आहे. उच्च न्याालयात महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही बाजू मांडू. रेती माफिया बंद कसे होईल यासाठी प्रयत्न करणार आहे असेही बावनकुळे म्हणाले देशात काय सुलभीकरण झाले हे जनतेला घरी बसून पाहता येईल. जनतेची फरपट थांबेल असा बदल करून जनतेला दिलासा देऊ. महसूल खात्याकडून होणारा त्रास थांबेल असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा…वर्ध्यात पाण्यासाठी हाहा:कार! पाणीपुरवठा बेमुदत बंद राहणार ?

राहुल गांधीचख दौरा नाटक

परभणीत घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपी हा मनोरुग्ण आहे तरी काँग्रेसला या विषयावर राजकारण करायचे आहे. त्यातूनच आता राहुल गांधी यांचा परभणी दौरा म्हणजे केवळ नाटक असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत करण्याचे काम काँग्रेसने केले . काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांचा उद्याचा परभणी दौरा हे केवळ नाटक आहे.महाराष्ट्रातील दलित समाज त्यांना साथ देणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा…थंडीला लागणार ‘ब्रेक’, हवामान खात्याचा पावसाचा अंदाज

पालकमंत्री पदाचा कुठलाही वाद नाही.

१२ जिल्ह्यात मंत्री नसले तरी, ज्या पद्धतीने खातेवाटप झाले त्याच पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप होईल. मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेलेले शरद पवार यांच्या वयानुसार ते वैद्यकीय परिस्थितीमुळे ते सोप्यावर बसले असतील. हा टीका टिपणीचा विषय नाही. महायुतीमध्ये भुजबळ यांचे मोठे स्थान आहे. त्याच्या राजकीय आयुष्याचा योग्य निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार , प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे निर्णय घेतील असेही बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revenue minister chandrasekhar bawankule said amending revenue act for societys poorest is necessary vmb 67 sud 02