लोकसत्ता टीम

बुलढाणा: शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांचे विश्वासू तथा घाटाखालील जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांच्याविरुद्ध स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचा झेंडा उगारला ! असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठून दाणे यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच कार्यवाही न केल्यास आम्ही ‘पक्षाचे काम बंद’ करणार असा इशाराही त्यांनी दिला.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा

आणखी वाचा-धक्कादायक! नागपुरातही हडपली पोलिसांची जमीन! राजकीय दबाव, बनावट कागदपत्रांचा आधार

सत्ताधारी शिंदे गटाच्या खामगाव, जळगाव, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर तालुक्यातील १५ पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठून ना उदय सामंत व अन्य नेत्यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. जिल्हाप्रमुख दाणे हे गटबाजी करीत असून सेनेच्या उबाठा गटाच्या नेत्यासोबत त्यांचे घनिष्ट संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये उप जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांचा समावेश आहे.त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार देऊन आरोपांची सरबत्ती च केली आहे . शांताराम दाणे हे गटबाजीचे राजकारण संघटन बांधणीसाठी अडचणी निर्माण करत असून उ बा ठा गटाच्या जिल्हा प्रमुखंसोबत असलेल्या जवळीक मुळे सामान्य शिवसैनिक संभ्रमात पडले आहे. दरम्यान लोकसभा तोंडावर असताना शिवसेनेत मोठी गटबाजी बघायला मिळत आहे.

Story img Loader