नागपूर : मुलीचे लग्न झाले असले तरी तिला अनुकंपा आधारावर मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे. विवाहित मुलीला अनुकंपा आधारित नाकारणे असंवैधानिक आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर सुनावणी करताना दिला आहे.

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) मध्ये काम करणाऱ्या राजू उसरे यांचा २०२० साली मृत्यू झाला. त्यांना पत्नी आणि दोन विवाहित मुली आहे. आई आणि मोठ्या बहिणीकडून सहमती घेऊन लहान मुलगी खुशबू चौतेल यांनी अनुकंपा आधारावर नोकरीसाठी अर्ज केला. ऑगस्ट २०२१ मध्ये वेकोलिद्वारा अर्ज नाकारण्यात आला. नॅशनल कोल वेज एग्रिमेंटमध्ये विवाहित मुलीला अनुकंपा आधारावर नोकरी देण्याची तरतुद नसल्याचे कारण वेकोलितर्फे देण्यात आले. वेकोलिद्वारा अर्ज नाकारल्यावर खुशबू यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली. ॲड. अनिल ढवस यांनी खुशबूच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली. ॲड. ढवस यांनी छत्तीसगढ उच्च न्यायालयातील आशा पांडे विरुद्ध कोल इंडिया प्रकरणाचा दाखला देत विवाहित मुलीला नोकरी नाकारणे असंवैधानिक असल्याचे सांगितले.

khasdar krida mahotsav, Yashwant Stadium,
नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”
fti former president gajendra chauhan s
अभिनेता गजेंद्र चौहान म्हणतात, “नागपूरने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला,…
Nagpur 3 idiot latest news in marathi,
नागपूर : ‘थ्री इडियट’ फेम सोनम वांगचुक म्हणाले, “विकास करतोय याचा अहंकार नको…”
amravati food poison news in marathi
अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…
14 year old girl pregnant loksatta news
Nagpur Crime News: १४ वर्षांची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती, प्रियकराविरुद्ध गुन्हा
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त
Nagpur female missing
उपराजधानीतून वर्षभरात ५५९ मुली-महिला बेपत्ता, बेपत्तांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण जास्त
emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
sonam wangchuck marathi news,
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”

हेही वाचा – महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले, नागपूरमध्ये कितीला मिळणार?

हेही वाचा – धनंजय मुंडेंचा ‘हा’ सल्ला सुप्रिया सुळेंना पटेल?

न्यायालयाने या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खुशबू यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने वेकोलिला एक महिन्याचा कालावधी देत यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीश अविनाश घरोटे आणि न्यायाधीश उर्मिला जोशी यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. वेकोलिच्यावतीने ॲड. पुष्कर घारे यांनी बाजू मांडली.

Story img Loader