नागपूर : ‘रामझुला हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी रितिका मालू हिला गुन्हे अन्वेशन विभागाचे (सीआयडी) अधिकारी मदत करीत आहेत.त्यामुळेच रितिका हिला जामिन मिळाला. जर सीआयडीने या प्रकरणात आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पुरावे नष्ट करणाऱ्या तहसीलचे ठाणेदार आणि तपास अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही, तर सीआयडीविरुद्ध न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा जनता फाऊंडेशनचे अध्यक्ष जीशान सिद्धिकी यांनी पत्रपरिषदेत दिला. यावेळी दोन्ही मृत युवकांचे कुटुंबीय उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितिका मालू आणि माधुरी सारडा यांनी दारुच्या नशेत कार चालवून रामझुल्यावर दुचाकीने जाणाऱ्या आतिफ आणि हुसैन या दोघांना धडक दिली. या धडकेत दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला. यावेळी तहसील पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक परशुराम भवाळ यांनी रितिका मालू आणि माधुरी सारडा यांना अटक करण्याऐवजी सोडून दिले होते. तसेच आरोपींच्या कारमधील दारुच्या बाटल्यासुद्धा बाहेर फेकून दिल्या होत्या. या प्रकरणी तहसील पोलिसांनी कोट्यधीश असलेल्या मालू आणि सारडा कुटुंबियांकडून पैसे घेऊन या प्रकरणाचा तपास आरोपींना मदत होईल, असा केला होता. त्यामुळे पीडितांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने तहसील पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत सीआयडीला तपास सोपवला होता. मात्र, सीआयडीचे तपास अधिकारी नयन अलूरकर यांनी या प्रकरणात गांभीर्य दाखवले नाही.

हेही वाचा >>>विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली

आरोपी रितिका आणि माधुरी सारडाच्या नातेवाईकांशी हातमिळवणी केली. ज्या गुन्ह्यात आरोपींना १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकरणात आरोपींविरुद्ध ६० दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात यावे, असा नियम आहे. मात्र, सीआयडीने या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल करण्यास चार महिन्यांचा अवधी लावण्यात आला. त्यामुळे रितिका मालू हिला ‘डिफॉल्ट’ जामिन मिळाला. हे सर्व सीआयडीने षडयंत्र केले आहे. या बदल्यात सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मोठी रक्कम मिळाली असावी. त्यामुळे रितिका मालूला जामिन मिळावा, यासाठी जाणिवपूर्वक उशिर लावण्यात आला, असा आरोपी सिद्धिकी यांनी केला आहे. उच्च न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी सीआयडीच्या विरुद्ध अवमानना याचिका दाखल करण्यात येईल. नव्या याचिकेत तपास अधिकारी नयन आलूरकर आणि अधीक्षक तांबे यांच्याही भूमिकेचा तपास करण्याची मागणी करण्यात येईल. तसेच ठाणेदार संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक परशूराम भवाळ, माधुरीचे पती शिशिर सारडा आणि रितिकाचे पती यांनी नव्याने आरोपी बनविण्यात यावे, अशी मागणी यावेळी जीशान सिद्धिकी यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ritika malu hit and run case cid officers help accused adk 83 amy