गोंदिया : शहरवासीयांना अनेक समस्या भेडसावत असताना त्याकडे कानाडोळा करत गोंदियातील आजी-माजी आमदार नगरपरिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या १ कि.मी. खडीकरणाच्या कामाचे श्रेय लाटण्यातच मशगूल असल्याचे शनिवारी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दिसून येत आहे.

प्रभाग क्रमांक २१ येथील ८,५५,९२३ रुपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बाल्या किराणापर्यंतचा रस्ता खडीकरण बांधकामाचे भूमिपूजन विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांनी शनिवारी उरकले. या कामाचे भूमिपूजन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी ११ फेब्रुवारीलाच केले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

हेही वाचा – सतत ज्ञानज्योत पेटविणारे ज्ञानदीप डॉ. प्रा. रघुनाथदादा कडवे यांची प्राणज्योत मालवली

हेही वाचा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ‘ती’ घोषणा, अन् जिल्ह्यात श्रेयवादाची लढाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर खडीकरणाचे काम हे आमदार निधीतील नसून नगर पालिकेतील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील गरजेच्या मागणीनुसार नगर परिषदेच्या सभागृहात मंजूर करवून घेतलेल्या कामांतर्गत आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण निधीतून गेल्या वर्षीच महाविकास आघाडीची सत्ता असताना मंजूर झालेले काम आहे. या कामाचा आमदारांशी काही संबंधच नाही. इतर आवश्यक कामांकडे कानाडोळा करीत आजी-माजी आमदार आता या कामाचे श्रेय लाटण्यातच मशगूल आहेत. यामुळे शहराच्या विकासाचा विचार कोण करणार, असा खोचक टोला माजी नगरसेवक पंकज यादव यांनी आजी-माजी आमदारांना लगावला आहे.