वाशिम : जलपातळीत वाढ करून शेतीला सिंचनाची जोड मिळावी म्हणून उन्हाळ्यात जलसंधारणाची कामे करण्याचे संकेत आहेत. मात्र, मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे ऐन पावसाळ्यात सुरू झाली. काही कामे पूर्ण झाली तर काही कामे सुरू असतानाच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक कामाचा खोळंबा होणार असून सिंचनाचा प्रश्न कसा मार्गी लागेल, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील जवळपास ७६ गावांत नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. नाल्यातील साचलेल्या गाळाचा उपसा करून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता वाढेल व शेतीला पाण्याची व्यवस्था होण्यास हातभार मिळेल, या आशेवर नाला खोलीकरण व रुंदीकरण केले जात आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी होण्याचे संकेत आहेत. परंतु जुलै महिन्यात ही कामे सुरू झाली. कामे सुरू असतानाच जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आले. त्यामुळे अनेक कामांचा खोळंबा उडणार आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्चून होत असलेल्या कामांतून किती सिंचन क्षमता वाढेल, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.

हेही वाचा – शेतातील चिखलात उतरून नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केली भात रोवणी

हेही वाचा – मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वर्धेकर रस्त्यावर

कामाचे फलक कधी लागणार ?

जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात नाला खोलीकरण व रुंदीकरण केले जात असल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. बहुतांश ठिकाणी कामाची माहिती दर्शविणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. लाखो रुपये खर्चून होत असलेली ही कामे गुणवत्तापूर्ण आहेत की नाही? याची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी ‘ऑन दी स्पॉट’ जाऊन मोजमाप घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.