बुलढाणा : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर शनिवारी झालेल्या चप्पलफेकचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यातही उमटले. आमदार पडळकरांनी शांततेचे आवाहन केले असतानाही रास्ता रोको करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “…ही तर तरुणांची थट्टाच”, नागपुरातील रोजगार महामेळाव्यावरून नाना पटोले यांची भाजपावर टीका

हेही वाचा – वाशिम : दोन दाम्पत्यांचे विस्कटलेले संसार नव्याने फुलले; लोक अदालतमध्ये प्रेमाचा समेट…

सिंदखेडराजा येथे खामगाव जालना महामार्गावर आज, रविवारी रास्ता रोको करण्यात आला. यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. चप्पलफेक करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आजच्या आंदोलनात केवळ धनगर बांधवच नव्हे तर समस्त ओबीसी घटक सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. जरांगे रोज भूमिका बदलत असल्याचा आरोप त्यांनी केला. तेही महाराष्ट्रात फिरत असल्याने त्यांच्यावरही चप्पलफेक होऊ शकते, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road block on khamgaon jalna highway anger over shoe throwing on gopichand padalkar scm 61 ssb