लोकसत्ता टीम

गडचिरोली : आरमोरी विधानसभेतील हिरंगे गावातील नागरिकांनी रस्त्यासाठी आमदार आणि प्रशासनाचे उंबरठे झिजविल्यानंतर अखेर स्वतःच लोकवर्गणी आणि श्रमदानातून रस्ता बनविला. त्यामुळे भाजपचे आमदार कृष्णा गजबे यांच्यावर नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकत्व घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात नागरिकांना अजूनही रस्त्यांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाबाबत आदित्य ठाकरेंची मोठी मागणी; म्हणाले, “सर्व विवादित भाग…”
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
K North Division office, K North Division office inauguration, mumbai, K North Division office mumbai,
मुंबई : के उत्तर विभाग कार्यालय अद्याप सुरू नाही, निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत उद्घाटन

जिल्हा मुख्यालयापासून ६० किलोमीटर अंतरावर धानोरा तालुक्यातील हिरंगे या गावात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सुद्धा रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले नाही. पावसाळ्यात पायवाटेने चिखल तुडवत नागरिकांना प्रवास करावा लागतो. आजारी रुग्णाला किंवा गरोदर मातेला घेऊन जाण्यासाठी बैलगाडी किंवा दुचाकीच्या साह्याने तारेवरची कसरत करावी लागते. आरमोरी विधानसभेत येत असलेल्या यागावातील नागरिकांनी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह प्रशासनाकडे रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात निवेदने दिली, वारंवार पाठपुरावा केला. पण उपयोग झाला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रामसभा बोलावून प्रत्येक घरातून वर्गणी गोळा केली आणि स्वतः कुदळ, पावडे हातात घेऊन श्रमदानातून रस्ता दुरुस्ती केला.

आणखी वाचा-बुलढाणा: मराठा आरक्षण उपोषण अन् मराठा क्रांती मोर्चा; प्रशासनाची डोकेदुखी वाढली

एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सोयीसाठी जगण्याचा संघर्ष वाट्याला आलेल्या हिरंगेवासियांनी हा उत्सव आम्ही का साजरा करावा असा प्रश्न उपस्थित केला आहे.

या मार्गाकरिता निधी प्राप्त झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्ते बांधकाम करण्यात येईल. तत्पूर्वी माझ्या निधीतून रस्त्याची डागडुजी करण्याचे निर्देश दिले आहे. मी स्वतः त्या गावाला उद्या भेट देणार आहे. -आ. कृष्ण गाजबे, आरमोरी

Story img Loader