बुलढाणा : जालना जिल्ह्यातील मराठा समाज आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. जळगाव मध्ये रास्ता रोको करणाऱ्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना बळाचा वापर करून स्थानबद्ध करण्यात आले.
जळगांव जामोद तालुका महाविकास आघाडी व समविचारी पक्षाच्या वतीने सकाळपासून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यामुळे वाहतुक ठप्प झाली. पोलिसानी बळाचा वापर करुन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, कॉग्रेसच्या स्वाती वाकेकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष गजानन वाघ, , कॉग्रेस तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, डॉ. संदिप वाकेकर, भिमराव पाटिल, रमेश ताड़े, संजुबाप्पु देशमुख, अर्जुन घोलप, पराग अवचार, महादेव भालतडक, आशिष वायझोडे, ईरफान खान, दत्ता डिवरे, सिद्धू हेलोडे, अक्षय भालतडक, प्रकाश भीसे, मंगल डोंगरदिवे, वैभव जाणे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्याना स्थानबद्ध केले.