लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा: २४ तासात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात वाहतूक कोसळून पडली आहे.सकाळी काही तालुक्यात वाहतूक बंद पडली,ती अद्याप सुरळीत झाली नसतांनाच नव्याने काही मार्ग बंद पडले आहे.

यवतमाळकडून तांबा गावी येणारा रस्ता खचून गेला. याच मार्गावर असलेल्या पुलाचा बराचसा भाग वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. देवळी तालुक्यातच हिवरा कावरे व विजयगोपाल रस्ता वाहत्या पाण्यामुळे ठप्प झाला. याच तालुक्यातील गणेशपुरच्या नाल्याला पूर आल्याने वाबगाव गणेशपुर मार्ग बंद झाला. आर्वी तालुक्यातील मजरा ते कासारखेड तसेच पानवाडी ते आजनगाव येथील वाहतूक थांबली. समुद्रपूर येथील पाणी टाकीवर शंकर तामगडगे व अन्य तीन व्यक्ती बुधवारी रात्रीपासून अडकून पडल्या.

आणखी वाचा-अमरावती विभागात आतापर्यंत पावसाचे ३१ बळी; ९ हजारावर विस्‍थापित

आपत्ती निवारण पथक त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत आहे. वर्धा तालुक्यातील शिरसगाव पुलावरून पाणी वाहू लागल्याने सारुळ गावाचा संपर्क तुटला. दरम्यान आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला. रेड अलर्ट देण्यात आल्याने मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त होते. बऱ्याच भागातील वाहतूक बंद पडली असल्याने अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याची सूचना आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roads were flooded and water over the bridge people stuck warning not to go out pmd 64 mrj
Show comments