लोकसत्ता टीम
गडचिरोली: मागील दोन वर्षापासून जिल्ह्याच्या उत्तर व पूर्व भागात धुमाकूळ घातलेल्या रानटी हत्तींच्या कळपातून भरकटलेल्या एका हत्तीने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात घुडगूस घातला. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओडिसा राज्यातील छत्तीसगडमार्गे जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपाने धानोरा, कुरखेडा, आरमोरी, देसाईगंज तालुक्यातील ग्रामीण भागात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान या हत्तींनी केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. या रानटी हत्तींचा उपद्रव सातत्याने वाढत असल्याने वनविभागही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अशातच गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रातील जारावंडी येथे कळपातून भरकटलेल्या एका नर हत्तीने धुडगूस घातला.
आणखी वाचा- सूर्य कोपला! अकोल्यात सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
हत्तीने जारावंडी येथील धान्य गोदामचा लोखंडी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तसेच नजीकच्या शेतातील तलांडी नामक शेतकऱ्याच्या घराचीही तोडफोड केली. प्रथमच जिल्ह्याच्या दक्षिण भागात रानटी हत्तीचे आगमन झाल्याने हत्तींनी आपला मोर्चा आता दक्षिण गडचिरोलीत वळविल्याचे दिसून येत आहे.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका रानटी हत्तीने जारावंडी गावात प्रवेश करीत येथील गोदामाची तोडफोड केली. मोह व धानाच्या वासाने त्याने गोदामाकडे धाव घेतली. यादरम्यान हत्तीने शेतातील झोपडीचीही नासधूस केली आहे. सदर हत्ती हा नर जातीचा असून अद्यापपर्यंत हत्तीने मानवावर हल्ला केलेला नाही. वनविभागाचे कर्मचारी यावर नजर ठेऊन आहेत. नागरिकांनीही विशेष खबरदारी घ्यावी. -बी. व्ही. खंडाते, वनपरिक्षेत्र अधिकारी, कसनसूर