आठवडाभरापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात दाखल झालेले रानटी हत्ती रात्रीच्या सुमारास गावात येत असल्याने गावकऱ्यांना गाव सोडून पाळावे लागत आहे. धानोरा तालुक्यातील मर्मा गावात मध्यरात्री या हत्तींनी चांगलाच धुमाकूळ घातला. हत्तींच्या कळपाने येथील अनेक घरांचे नुकसान केले.
गडचिरोली जिल्ह्यावर रानटी हत्तीच्या रूपाने नवे संकट ओढवले आहे. शेकडो वर्षांनंतर छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात जवळपास ३० हत्तींचा कळप दाखल झाल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण आहे. वनविभाग दिवसरात्र या कळपावर नजर ठेऊन आहे. मात्र, रात्रीच्या सुमारास हे हत्ती जवळील गावात दाखल होत असल्याने त्यांना नियंत्रित करणे कठीण होऊन बसले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – गडचिरोली : सावधान! घराबाहेर पडू नका, गावात वाघ आलाय…

मुरूमगाव वनपरिक्षेत्रात सध्या या हत्तींनी बस्तान मांडले आहे. दिवस जंगलात घालविल्यानंतर हा कळप अन्नाच्या शोधात मर्मा गावात दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी वनविभागाची चमू उपस्थित होती. गावकऱ्यांना त्यांनी सुरक्षित स्थळी हलविले. मात्र, हत्तीच्या कळपाने आठ ते दहा घरांचे नुकसान केले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून हत्ती येणार या भीतीने गावकरी रात्र जागून काढत आहेत.