लोकसत्ता टीम

बुलढाणा: चिखली शहरात शनिवारी उत्तररात्री दरोडेखोरांच्या टोळीने हैदोस घातला! त्यांनी दाम्पत्याला मारहाण केली असून यात महिला गंभीर जखमी झाली आहे.

Bavdhan , pistols, cartridges , koyta ,
पिंपरी : बावधनमध्ये तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते जप्त
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
nitin gadkari
Nitin Gadkari : करोना, दंगली, लढायांपेक्षा अधिक मृत्यू अपघातांमुळे… खुद्द गडकरींनीच…
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
robbery at Mayank Jewellers in Vasai Jeweller owner injured
वसईतील मयंक ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; सराफ मालक जखमी, लाखोंची लूट
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”

चिखली शहरातील गजानन नगर परिसरातील गजानन नवले राहतात. आज उत्तररात्री त्यांच्या घरात ६ दरोडेखोरांनी मागचा दरवाजा तोडून प्रवेश केला. गजानन नवले आणि त्यांच्या पत्नी अलका नवले मागील बाजूला झोपलेल्या होत्या तर नवले यांचे भाऊ पप्पू नवले हे समोरच्या खोलीत झोपले होते. चार चाकी वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी पती पत्नीला उठवून सोने कुठे, पैसे कुठे याची विचारणा केली. यानंतर अलका नवले यांच्या हातावर ‘रॉड’ मारून हात मोडला आणि डोक्यावर देखील वार केले.

आणखी वाचा-चंद्रपूर : १९३ कारखान्यांमध्ये अतिधोकादायक रसायनांचा वापर

गजानन नवले यांना देखील बेदम मारहाण केली. अलका नवले यांनी जोरात आरडाओरड केल्याने समोरच्या खोलीत झोपलेले पप्पू नवले धावत आले. शेजारी देखील जागी होऊन घराबाहेर पडले. त्यामुळे दरोडेखोरांनी चारचाकी वाहनातून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी दरोडेखोरांचा पाठलाग करण्याचा असफल प्रयत्न केला. घटनास्थळी रात्रीच पोलीस दाखल झाले होते. गंभीर जखमी पती पत्नीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अलका नवले यांच्या डोक्याला ३५ टाके लागले आहेत.

Story img Loader