बुलढाणा: नांदुरा तालुक्यातील वडाळा येथे झालेल्या खळबळजनक घटनेत दरोडेखोरांनी दीड लाखांचा ऐवज लुटला. या घटनेत एक महिला जखमी झाली. यामुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहे.

आज सोमवारी उत्तररात्री दरोडेखोराच्या टोळीने वडाळा येथील अनिल शाळीग्राम वकटे यांच्या घरात प्रवेश केला. यावेळी घरात अनिल, त्यांची पत्नी, आई, वडील, मुलगा झोपलेले होते. दरोडेखोरानी अनिल व त्यांच्या पत्नीस जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पत्नीस जखमी केले. तिच्या अंगावरील व कपाटातील सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व दहा हजार रोख असा १ लाख ४७ हजाराचा ऐवज हुसकावून पळ काढला.

हेही वाचा… १९ वर्षानंतर योग! यंदा श्रावण महिन्यात तब्बल आठ सोमवार

नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल बेहेरानी , त्यांचे सहकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेतील दरोडेखोर २५ ते ३० वयोगटातील असल्याचे फिर्यादी अनिल वकटे यांनी संगितले. भादवीच्या कलम ३९५, ३९७, ४५२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणेदार बेहेरानी तपास करीत आहे.

Story img Loader