नागपूर : शस्त्राच्या धाकावर दरोडा घालणार्‍या आरोपींना गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने घटनेच्या केवळ ३६ तासाच्या आत हुडकून काढले. आरोपींच्या शोधासाठी परिसरात आणि जवळपासच्या मार्गावरील २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक पद्धतीचा वापर करून घटनेचा उलगडा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयंत कांबळे (२४) रा. बेलतरोडी, शेख अमीन उर्फ अस्लम (२१), अल्ताफ अहमद खान (५२) दोन्ही रा. कपिलनगर, निखिल उर्फ हिमांशू कैतवास (२५) रा. सोमवाडा, सुमित घोडे (२६) रा. महाजन वाडी, मंगेश झलके (३७) रा. गजानन नगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून रोख पाच लाख १० हजार रुपये, ६ मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले. इमरान खान उर्फ राजा (२८) रा. कपिल नगर, अब्दुल फहीम उर्फ चुहा रा. शांतीनगर आणि दानिश शेख रा. यशोधरा नगर आणि त्यांचे दोन साथीदार यांचा शोध सुरू आहे. ही घटना शुक्रवारच्या मध्यरात्री हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत न्यू ओमनगरच्या रोटकर ले-आऊट परिसरात घडली. पोलिसांनी अमित दुरुगकर (३४) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

हेही वाचा – प्रेयसीवर जीवापाड प्रेम, साता जन्माच्या आणाभाका; पण अर्ध्यावरती डाव मोडला अन् प्रियकराने…

सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया यांनी शहरातील सीओसीचे तसेच खासगी जवळपास २०० कॅमेर्‍यांची तपासणी केली. तसेच अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर करून गुन्हे शाखेच्या सायबर सेलची विशेष मदत घेवून दरोड्याचा कट रचणारा मुख्य आरोपी जयंत कांबळे याचा शोध घेवून ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया, रवी अहिर, प्रशांत गभने, श्रीकांत उईके, प्रवीण रोडे, आशिष वानखेडे, निलेश श्रीपात्रे, सुधीर पवार, अनंता क्षीरसागर, पराग ढोक यांनी केली.

हेही वाचा – “ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण…”, अमृता फडणवीसांनी घेतलेल्या उखाण्याची चर्चा; नागपुरातील कार्यक्रमात लावली हजेरी!

म्होरक्याला मिळाली टिप

फिर्यादीच्या घरी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने आहेत. अशी गुप्त माहिती मंगेश झलके, सुमीत घोडे यांच्याकडून म्होरक्याने मिळविली. दरोडा टाकण्यासाठी गुंड उपलब्ध करून देणारा शेख अमिन याच्यासोबत संपर्क करून आरोपी इमरान खान, दानिश, फहीम चुहा व ईतर आरोपीसोबत कट रचला आणि मध्यरात्री फिर्यादीच्या घरी प्रवेश करून दरोडा घातला. आधी संपूर्ण लाईट बंद केली. फिर्यादीच्या भावाला डांबले. नंतर फिर्यादीच्या आईला जीवे मारण्याची भीती दाखवून फिर्यादीच्या हातावर शस्त्राने वार करून आठ लाख रुपये घेवून फरार झाले. नंतर दरोड्याची रक्कम आपसात वाटून घेतली. अटकेतील आरोपींना हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in nagpur police arrested the accused within 36 hours adk 83 ssb