वर्धा: राज्यात मराठा आरक्षण आणि मंत्री छगन भुजबळ यांची त्याबाबतची भूमिका वादाची ठरली. तरीही नव्याने भुजबळ या विषयावर बोलले. त्याची दखल आमदार रोहित पवार यांनी घेतलीच. त्यांच्या नेतृत्वात निघालेली संघर्ष यात्रा आज जिल्ह्यात पोहचली. वायफड येथे पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी चांगलेच टोले हाणले.
ते म्हणतात, भुजबळ हे सत्तेत आहे. तुमच्याकडे संवैधानिक पद असेल तर त्याचा वापर सामान्य लोकांसाठी केला पाहिजे. कॅबिनेटमध्ये तुम्ही बोलले पाहिजे. बाहेर मोठमोठी भाषणे करण्यापेक्षा पद सोडा नाही तर कॅबिनेट मध्ये चर्चा करा. सत्तेत असलेल्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी कुटुंब व पक्ष फोडण्याची जबाबदारी घेतली आहे. तसेच राज्यातील महत्त्वाचे प्रोजेक्ट गुजरातला नेवून तेथील युवकांना न्याय देण्याची सुद्धा सुपारी सरकारच्या सर्व नेत्यांनी घेतली आहे.
हेही वाचा… नागपूर: शासकीय अधिकाऱ्यांच्या बंगल्यात घुसून चंदन चोरी, दुचाकी वाहनासह ५७ हजार रुपयांचा माल जप्त
सामान्य लोक अडचणीत आहे मात्र स्वतःचे हीत जोपासण्याचीच सुपारी यासर्व नेत्यांनी घेतली आहे, असा घणाघात रोहित पवार यांनी केला.