नागपूर : मराठा आरक्षणच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यानंतर एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आपसात बोलत होते. त्यांचे संभाषणाची चित्रफित व्हायरलं झाली. त्या तिघांच्या संभाषणाचा आधार घेत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या तिन्ही मंत्र्यांच्या कारभारावर सडकून टीका होत आहे.
हेही वाचा >>> आमदार अपात्रतेबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी संदर्भ दिलेले ‘शेड्यूल १०’ काय आहे? जाणून घ्या…
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते आमदार रोहित पवार यांनी नागपुरात बोलताना सरकार कोणत्याच विषयावर गंभीर नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, बोलून मोकळे व्हायचे… असे मुख्यमंत्री म्हणतात यावरून कळते की सरकार किती गंभीर आहे. हे तिन्ही नेते सत्तेत केवळ पद, निधी मिळवण्यासाठी आले आहेत. ते दररोज याला मंत्री बनवायचे की त्याला अशा चर्चा करीत असतात आणि आपल्या जवळच्या लोकांना मंत्रिपद वाटत असतात. या सत्ताधाऱ्याचे हेच काम सुरू आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नाबाबत, युवकांना रोजगार देण्यातबाबत ते गंभीर नाहीत.