नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून मोठं भाष्य केले. एका सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात तीन खासगी कर्मचारी काम करू शकतात, असे ते म्हणाले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचे नाव न घेता टीका केली. एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित पवारांच्या टीकेला अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले होते. सत्तेत सामील होण्यासाठी सर्वात आधी रोहित पवारांनीच समर्थन दिले होते, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यावर रोहित पवार यांनी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत उत्तर दिले. अमोल मिटकरी यांनी हवेत गोळ्या झाडणे बंद करावे, हिंमत असेल तर समोर या आणि पुरावे द्या ,असे आव्हान दिले.भाजपच्या धोरणावर एकेकाळी टीका करणाऱ्या मिटकरी यांनी सत्तेसाठी भूमिका बदलली, त्यांनी असे हवेत गोळ्या झाडणे बंद करावे, असे रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा >>>विला ५५ कॅफेत हुक्क्याचा धूर, नागपूरच्या गोकुळपेठेतील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

काय म्हणाले होते मिटकरी

रोहित पवारांना उद्देशून अमोल मिटकरी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हणाले, “दादा, आपण राजकारणात अजून लहान आणि नवखे आहात. ज्यांच्याविरुद्ध आपण बोलत आहात त्यांनी आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. सत्तेत सहभागी होताना सर्वप्रथम समर्थन आपलेच होते, याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आता सरकारला सरकारचे काम करू द्या आणि स्वतःला सावरा.