गडचिरोली : परवाच भामरागड येथे रुग्णवाहिकेअभावी तरुणाचा मृतदेह दुचाकीला खाट बांधून नेण्याचे प्रकरण ताजे असताना वाहतूक व्यवस्था ढासळल्याचे चित्र असून गडचिरोली ते अहेरी बसचे छप्पर उडाल्यामुळे त्याच अवस्थेत धावताना चित्रफीत प्रसारित झाली आहे. सुदैवाने बसचे छप्पर तुटून अर्ध्यात अडकल्याने अपघात टळला.
हेही वाचा – तलाठी भरतीत ‘सेटींग’ होईल का? उमेदवारांकडून विचारणा; १९ लाखांचा दर अन्…
हेही वाचा – वर्धा : बुलेटला पंजाबी सायलेंसर लावणाऱ्या पोलीस अंमलदारावर कारवाई
मागास अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. पावसाळ्यात बसमध्ये पाणी गळणे, रस्त्यात बंद पडणे हे नित्याचेच असताना बुधवारी चालत्या बसचे चक्क छप्परच उडाले. गडचिरोलीवरून अहेरी जात असलेल्या या बसचे चामोर्शी मार्गावर छप्पर उडाले. अर्धवट छप्पर तुटलेल्या अवस्थेत ही बस काही किलोमीटर तशीच धावत राहिली. समाजमाध्यमावर बसची चित्रफीत प्रसारित होताच नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहे. या संदर्भात अहेरी आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.