नागपूर : राज्यातील रूफ टॉप हॉटेलवर बंदी आणावी, यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. लक्षवेधीवरील चर्चेवेळी वडेट्टीवार बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांना १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ, शिंदे गटातील आमदार म्हणाले…

हेही वाचा – “…म्हणून लग्नासाठी मुलगी मिळत नाही”, शेतकरी पुत्रांची विधानभवनावर धडक, म्हणाले…

वडेट्टीवार म्हणाले, मुंबई, पुण्यात हॉटेलला आग लागून माणसांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या. मुंबईत विमानतळजवळ ऑर्चिड हॉटेल आहे. तिथे रुफ टॉप हॉटेल आहे. त्याला परवानगी नाही. पुण्यातील २१ रूफ टॉप हॉटेलवर कारवाई केली. सहा लाखाचा दंड केला. नंतर तोडपाणी करून हॉटेल पुन्हा सुरू झालेत. हे गंभीर आहे. आगीच्या घटना घडल्या की चर्चा होते. त्यामुळे सरकारने यासंदर्भात निर्णय घ्यावा. अन्यथा पुन्हा दुर्दैवी घटना घडतील. यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Roof top hotel will be banned what is the demand of vijay wadettiwar rbt 74 ssb