अकोला: ‘आरपीएफ’कडून राज्यातील विविध रेल्वे विभागात विशेष अभियान राबवून बेपत्ता, हरवलेल्या किंवा घरातून निघून आलेल्या ४०८ मुलांचा शोध घेण्यात आला. त्यांची मुलांची आस्थेने विचारपूस करून त्यांची व पालकांची पुनर्भेट घडविण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अभियानांतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही रेल्वे पोलीस पार पाडत आहेत.
कौटुंबिक वादविवाद, समस्या, मोठ्या शहरामंध्यम जाण्याची ओढ आदी कारणांने मुले घरातून बाहेर पडतात. आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानक गाठतात. अशी सैराभर फरणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना रेल्वेस्थानकावर आढळूण येतात. हे प्रशिक्षित ‘आरपीएफ’ पोलीस मुलांशी संपर्क साधतात. त्यांच्या समस्या समजून घेतात. त्यांची समजूत काढून त्यांना पालकांसोबत जाण्याचा सल्ला दिला जातो. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक प्रशासनाप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.
हेही वाचा… राज्यभरातील संस्थाचालक संतप्त; मागितले चौदाशे कोटी व मिळाले अवघे चाळीस कोटी रुपये
मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने सरकारच्या समन्वयाने ४०८ मुलांचा शोध घेऊन त्यांची सुटका केली आहे. २०२३ मध्ये एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकावरील फलाटावर रेल्वे पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांनी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अभियान राबवले. त्यामध्ये ३१८ मुले आणि ९० मुलींचा शोध लागला. यामध्ये ‘चाइल्ड लाइन’सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या मुलांची पालकांशी भुनर्भेट घडवून आणली आहे.
हेही वाचा… नवजात बाळावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया; जगात या आजाराचे केवळ ४०० रुग्ण
मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये हे मुले आढळून आले आहेत. मुंबई विभागाने ९२ मुलांची सुटका केली, त्यात ५८ मुले आणि ३४ मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागाने ९४ मुले आणि २५ मुलींचा समावेश असलेल्या ११९ मुलांची सुटका केली. पुणे विभागाने १३८ मुलांची सुटका केली असून त्यात सर्व मुलांचा समावेश आहे. नागपूर विभागाने ४० मुलांची सुटका केली, त्यात २१ मुले आणि १० मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागाने १९ मुलांची सुटका केली असून त्यात सात मुले आणि १२ मुली आहेत.