नागपूर : RSS Chief Mohan Bhagwat  दत्ताजींचा काळ हा कार्यविस्तारासाठी अत्यंत प्रतिकूल होता. ही प्रतिकूलता कार्याच्या गुणवर्धनाला अनुकूल बनवत होती. परंतु, आज आमचे काम अजून कठीण झाले आहे. कारण सध्याची अनुकूलता संघाच्या स्वभावाच्या पोषणासाठी प्रतिकूल आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लोकजागर : कंत्राटदारांची उपराजधानी!

दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपीय सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला अंजनगाव सुर्जी देवनाथ मठाचे स्वामी जितेंद्रनाथ महाराज, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही, जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. डॉ. भागवत पुढे म्हणाले, आज समाजाने लादलेली अनुकूलता आहे. त्यामुळे आपल्याला त्यासोबत जावेच लागेल. उजवीकडे किंवा डावीकडे जाण्याचा मार्ग उरलेला नाही. आज रस्ता अनुकूल असून तो आपल्याला टाळता येणार नाही. तेव्हा अनुकूलता असली तरी शील आणि तत्व ढासळू द्यायचे नाहीत. प्रतिकूलतेचा आधार नसल्याने अधिक जोमाने आपल्याला काम करावे लागेल, असे आवाहन सरसंघचालकांनी केले. केवळ लोकप्रियता आणि साधनसंपत्तीच्या भरवशावर आपल्याला कार्यसिद्धीस नेता येत नाही. आज दशा बदलली, समाजाची स्थिती बदलली पण दत्ताजींनी दाखवलेली दिशा बदललेली नाही, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss chief mohan bhagwat attend dattaji didolkar birth centenary event in nagpur zws